Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar Health । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Ajit Pawar

Ajit Pawar Health । निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अनेक बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. बडे नेते राज्यातील वेगेवेगळ्या मतदारसंघात सभा घेताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे देखील प्रचाराच्या धामधुमीत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यांसाठी अजित पवार यांनी सभा घेतली होती. यामुळे अजित पवार यांची प्रकृती (Ajit Pawar Health) बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News । मुंबईनंतर पुण्यात घडली धक्कादायक घटना, वादळी वाऱ्यामुळे कोसळलं भलंमोठं होर्डिंग

प्रचारसभांच्या धावपळीमुळे अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे(Ajit Pawar Health) त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोडशो’ला देखील जाता आलं नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. अजित पवार त्याठिकाणी उपस्थित नसल्याने ते नॉटरिचेबल आहेत का? असा सवाल केला जात होता. मात्र अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याची माहिती मिळत आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांच्या सभेवेळी घडलं भयानक; वादळ सुटले, बॅनर पडले अन्…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते उमेश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याचं उमेश पाटील यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे अजित पवार हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Mumbai hoarding collapse । मुंबई होर्डिंग घटना: भावेश भिंडे फक्त 4 होर्डिंग्जमधून वर्षाला 25 कोटी रुपये कमवत होते का?

Spread the love
Exit mobile version