Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । अजित पवार गटाला किती जागा हव्यात? छगन भुजबळांनी थेट आकडाच सांगितला

Ajit Pawar And Chagan Bhujbal

Ajit Pawar । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीसाठी सर्व पक्ष सक्रिय झाले आहेत. विशेषतः महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 60 जागा मिळतील अशी चर्चा आहे. पण अजित पवार (Ajit Pawar) गटाने 60 पेक्षा जास्त जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यावर छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे. (Politics News )

Harshwardhan Patil | इंदापूरच्या राजकारणात खळबळ; दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ, हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलं

‘टीव्ही 9 मराठी’च्या कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या जागा वाटपावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार गटाला 60 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. भुजबळ म्हणाले, “आमच्याकडे सध्या 60 जागा आहेत. त्यावर 20 ते 25 अतिरिक्त जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. अजित दादांनी 60 जागा देण्याची मागणी केली नाही, पण त्यांचा आग्रह आहे की, आम्हाला अधिक जागा मिळाव्यात.”

Cabinet Metting । सर्वात मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय

भुजबळांनी राजकारणातील विरोधकांबद्दलची भूमिका देखील स्पष्ट केली. त्यांनी नमूद केले की, राजकारणात कोणालाही दुश्मन समजले जात नाही. “आरक्षणासाठी मी पवार, मोदी, राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरेंकडे जाईन,” असे भुजबळ म्हणाले. “राजकारणात शंका घेणं चुकीचं आहे. आम्ही अजितदादांना आणि महायुतीला पूर्ण समर्थन देत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

Pune Crime News । भयानक घटनेने पुणे हादरले! प्रेयसीच्या मुलानं उलटी केली, प्रियकरानं मारहाण करून केली हत्या

Spread the love
Exit mobile version