Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । “…मला त्या चुकीचा खूप पच्छाताप होतो”, अजित पवारांनी सर्वांसमोरच बोलून दाखवली चूक

Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यात जन सन्मान यात्रा काढत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) आपल्याकडून मोठी चूक झाली, आता आपल्या चुकीचा पश्चाताप होत असल्याचे अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत बहिण सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासमोर पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उभे करून चूक केली, असे अजित पवार म्हणाले.

Accident News । भयानक अपघात! डंपरने महिलेला चिरडले, दोन्ही पायावरून गेले चाक

देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यात सुनेत्रा पवार यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या गेल्या तीन वेळा याच मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली.

Munawar Faruqui । अखेर त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुन्नावर फारुकीने मागितली जाहीर माफी; पहा व्हिडीओ

अजित पवार म्हणाले, माझे माझ्या सर्व बहिणींवर खूप प्रेम असून, माणसाने कधीही आपल्या घरात राजकारण येऊ देऊ नये. पत्नी सुनेत्रा यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून मी चूक केली, असे ते म्हणाले. असे घडायला नको होते, पक्षाने सुनेत्रा यांना सुप्रिया यांच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय घेतला होता, असं ते म्हणाले आहेत.

Ajit pawar । अजित पवार विधासभेला बारामतीतून पराभूत होतील; बड्या नेत्याचा दावा

Spread the love
Exit mobile version