Ajit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar group) असे दोन गट पडले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटी नंतर राज्याच्या राजकारणात ‘हाय प्रोफाईल रामा’ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ताब्यात घेण्याच्या लढाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आपला गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे देखील सांगितले जात आहे. यामध्येच आता अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सगळीकडे त्यांच्या विधानाची चर्चा आहे.
Accident News । एका क्षणात सर्व उध्वस्त! भीषण कार अपघातात आईसह मुलाचा मृत्यू
अजित पवार म्हणाले, “मी जे बोलतो ते वस्तुस्थितीला आधारित असते. परखडपणे बोलण्याची माझ्यात धमक आहे. खरंच सांगतो वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे. त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना नाव न घेता लगावला आहे. नाशिकच्या कालिदास काली मंदिर या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे व्यक्त केल आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“मी वस्तुस्थितीशी बोलणारा माणूस आहे. तुमच्या तोंडावर एक आणि तुमच्या पाठीमागे वेगळे बोलायचं असे मी करत नाही. जर तुम्ही गेल्या 30-35 वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की आता या लोकांना सुद्धा संधी दिली पाहिजे आणि या 80-85 वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचे किंवा सल्ला देण्याचे काम केले पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे”. असा अजित पवार म्हणाले आहेत.
Cabinet Meeting । नवीन वर्षाचं शिंदे सरकारने दिलं मोठं गिफ्ट; घेतला मोठा निर्णय