Ajit Pawar : मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वांना धक्का बसला. यानंतर राष्ट्रवादीत मोठी उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीत पडले. दरम्यान आता आगामी निवडणुकांचा विचार केला तर शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप सोबत असून आगामी निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे दावे केले जात आहेत. यामध्येच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी एक मोठं वक्तव्य केल आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील असे वक्तव्य त्यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. (Upcoming 2024 elections)
Accident News । ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू
त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, बदलत्या राजकीय गणितात आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादाची महायुती आहे. त्याचबरोबर आगामी ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये आपण देखील घड्याळ चिन्हाचा प्रचार करणार आहोत. भाजपला दिलेले मत विकासरुपाने परतफेड करण्याचा भाजपचा संस्कार आहे. त्याचबरोबर 2024 च्या आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार देखील कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील असे ते म्हणाले आहेत सध्या त्यांच्या वक्तव्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
सर्वात मोठी बातमी! लवकरच काँग्रेस पक्ष फुटणार, भाजपच्या बड्या खासदाराचा खळबळजनक दावा