“अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू तर सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक”, गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; नवीन वाद निर्माण होणार?

Politics News

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. शरद पवार यांच्यावर टीका करताना ते कोणताच विचार करत नाहीत. अगदी खोचक शब्दांमध्ये ते त्यांच्यावर टीका करत असतात. सध्या देखील गोपीचंद पडळकर एका नव्या वक्तव्याने चर्चेत आले आहेत. यामुळे वाद देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

Success Story । तरुणाचा नादच खुळा! सासरच्यांकडून शिकून दोन बिघा शेतात सुरू केली परवलची शेती, महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमाई

अजित पवार (Ajit Pawar) लबाड लांडग्याचे पिल्लू त्याचबरोबर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेकी अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला हा वाद काही नवीन नाही. गोपीचंद पडळकर कायमच राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करत असतात. त्यांनी याआधी देखील शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मात्र सध्या अजित पवार सत्तेत आहेत त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे त्यामुळे आता या टिकेवरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Washim News | धक्कादायक! कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन संपवले जीवन

नेमकं काय म्हणाले पडळकर?

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोपीचंद पडळकर यांनी पत्र पाठवल आहे मात्र अजित पवार यांची भावना आमच्याविषयी स्वच्छ नसल्याने आम्ही त्यांना पत्र पाठवले नाही असे गोपीचंद पडळकर म्हणाले. त्याचबरोबर ते लबाड लांडग्याचे पिल्लू आहे असे देखील ते म्हणाले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावरून देखील टीका केली आहे. ते म्हणाले ही लबाड लांडग्याची लेक बोलते त्यावर फार लक्ष देण्याची गरज नाही असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.

Mahogany Farming । महोगनीच्या एका झाडापासून तुम्ही कमावू शकताय लाखो रुपये; जाणून घ्या कशी करायची लागवड?

Spread the love