Ajit Pawar । सध्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील धाराशिव लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी एक मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये आलो असल्याचा खुलासा मल्हार पाटील यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आता ठाकरे गटाच्या उमेदवाराने अजित दादांना सवाल केला आहे.
अजित दादांच्या सांगण्यावरून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा मल्हार पाटील यांनी केला. आता या दाव्यानंतर ठाकरे गटाचे नेते धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडायचे षडयंत्र चालू होते का? असा थेट सवाल त्यांनी अजित पवार यांना केला आहे.
दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. यावेळी त्यांचाच मुलगा मल्हार पाटील यांनी आम्ही 2019 मध्ये राष्ट्रवादी सोडून अजित दादांच्या सहमतीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मी अत्यंत जबाबदारीने सांगू शकतो की अजित दादांनी आम्हाला पाठवल आणि मग ते भाजपमध्ये आले. असे मल्हार पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
Ajit Pawar । अजित पवारांना सर्वात मोठा धक्का, बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?