Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अजित पवार विधानसभेत कडाडले; म्हणाले…

Ajit Pawar lashed out at the Assembly over the issue of farmers; said…

राज्यात कालपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( Maharashtra budget session 2023) सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांना बजावला गेलेला व्हीप, सत्ताधारी व विरोधकांमधील टीका युद्ध यामुळे हे अधिवेशन चर्चेत आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत.

आईच्या मृत्यूनंतर नरेंद्र मोदींना आणखी एक मोठा धक्का; कुटुंबातील ‘या’ व्यक्तीची प्रकृती गंभीर

दरम्यान, मागच्या दोन दिवसापूर्वी राज्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक मिळाला होता. आता हा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना अजित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. राज्य सरकारनं सर्व कामकाज बाजूला ठेवून आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मोठी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

एमसी स्टॅन लवकरच लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज कामकाज सुरू होण्याआधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदे घेऊन दाखल झाले आहेत. एवढंच नाही तर काही आमदारांनी चक्क गळ्यात लसूण,कापूस, कांद्याची माळ घातली आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारला कांद्यासारखे सोलून काढू असा इशारा विरोधकांनी दिला आहे.

हाताच्या कोपऱ्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्याचे जालीम उपाय; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version