
मागच्या काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला होता. अहमदनगर (Ahmdnagar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली. महाविकास आघाडीची मतं फुटल्याने भाजपचे शिवाजी कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची बोलले जात होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेली सहकारी बँक भाजपच्या ताब्यात गेली आहे.
महाविकास आघाडीचे उदय शेळके यांच्या निधनानंतर अध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती. यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी अध्यक्षपदासाठी दावेदारी केल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. आणि यात भाजपचा विजय झाला. दरम्यान बहुमत असून देखील एका मताने पराभव झाला. त्यामुळे हा पराभव अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता यावर ते संतपल्याचे दिसत आहे.
सावरकर होण्याची तुमची लायकी नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहमदनगरमध्ये आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एका कार्यक्रमासाठी अजित पवार उपस्थीत होते. यावेळी बोलताना त्यांनी जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले ” गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही”. अस ते यावेळी म्हणाले आहे. त्यांच्या वक्तव्याची साध्या जोरदार चर्चा चालू आहे.