गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट. यांनी वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.
मोठी बातमी! LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त
गिरीश बापट यांना जाऊन तीन दिवस उलटले नाही तोपर्यंत पुण्यात भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
इंदूरमधील त्या घटनेबाबत समोर आली मोठी अपडेट; मृतांचा आकडा वाढला
यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, ” बापटांच्या निधनाला फक्त तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे घाईगर्दीत कोणाला पायात घुंगरु बांधण्याची गरज नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, राज्याच्या राजकारणाची काही परंपरा आहेत. नीतीमूल्य आहेत. या पद्धतीने वक्तव्य करताना महाविकास आघाडीला लाज का वाटत नाही? असं म्हणत अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता अजित पवारांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
विराट कोहलीने शेअर केली 10वीची मार्कशीट, गणितात सर्वात कमी गुण; पाहा पूर्ण निकाल