Ajit Pawar । सुप्रिया सुळेंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar

Ajit Pawar । भाजप (BJP) आणि शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केल्यापासून अजित पवार गट सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून शरद पवार गटाला टार्गेट करत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कशाप्रकारे निवडून आल्या ते सांगितले आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest marathi news)

Mumbai News । धक्कादायक बातमी! वडिलांचा पीएफ मागितल्यावर कंपनीच्या एचआरने मुलीकडे केली सेक्सची मागणी

“महादेव जानकर (Mahadev Jankar) हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे खडकवासला मतदारसंघात माहिती नव्हतं. जर ते माहिती असतं तर मतांमध्ये लाखांचा फरक पडला असता. या मतदारसंघातून 2014 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा फटका बसला होता. त्यावेळी सुळे यांनी खडकवासला मतदारसंघांमधून मोठी पिछाडी तर बारामतीतून आघाडी मिळाली असल्याने त्यांचा विजय झाला,” असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे.

Arvind Kejriwal । सर्वात मोठी बातमी! दिल्लीत लागू होणार राष्ट्रपती राजवट?

जर महादेव जानकर कमळ या चिन्हावर लढले असते तर ते निवडून आले असते. यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवून महायुतीचा उमेदवार निवडून द्या. काही ठिकाणी घड्याळ काही ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ महायुतीत चिन्ह आहे, असे आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले आहे. त्यामुळे आता जनता कोणाला निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Vijay Shivtare । चिन्ह कमळ का असेना, पण बारामतीतूनच लढणार, विजय शिवतारेंमुळे वाढले अजितदादांचे टेन्शन

Spread the love