
राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) पक्षातील काही आमदारांसह भाजपसोबत जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच अजित पवार यांनी एक आठवड्यापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांची भेट घेतली होती. असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. यावेळी अजित पवारांसोबत सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते असे सांगितले जात आहे.
सर्वात मोठी बातमी! उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी
या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. “अजित पवार दिल्लीमध्ये जाऊन अमित शाह यांना भेटले की नाही ? हे त्यांनाच विचारावे लागणार आहे. ही फक्त शक्यता आहे. मात्र अजित पवारांची भेट काही राजकीय गोष्टीसाठी किंवा कामासाठी होती हे माहिती नाही. मुळात अजित पवार अमित शाह यांना भेटले का? याचे खात्रीलायक स्पष्टीकरण अजून कोणीही दिलेले नाही. त्यामुळे फक्त तर्कावर चर्चा करायला नको. ” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून दुखापतीमुळे बाहेर
दरम्यान इंग्रजी वृत्तपत्राने म्हंटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून अजित पवारांना भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांचा सुद्धा पाठिंबा आहे. मात्र शरद पवार भाजपसोबत जण्यास इच्छुक नाहीत. ८ एप्रिलला अजित पवारांनी दिल्लीला जाऊन अमित शाहांची भेट घेतली. त्यासाठी चार्टर्ड विमानाचा वापर केला होता.
16 आमदार अपात्र झाले तरीही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार; अजित पवारांचा मोठा दावा