Ajit Pawar । बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा? असे ट्विट करत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. (Politics News)
त्याचबरोबर “विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत त्याचे हे व्हिडीओ..तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही. अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल. असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत. आता या सर्व आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ” निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणा, स्कॉड, सर्वच जण काम करत आहेत. विरोधकांकडून चुकीचे आरोप केले जातायेत. रात्री बँक उघडी असल्याचे म्हणतात, प्रत्येक बँकेबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असतात. ते तुम्ही चेक करु शकतात. आरोप करणाऱ्यावर व्यक्तीवर परिणाम झाला आहे. त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. असं अजित पवारांनी म्हंटले आहे.
Mumbai Crime । मुंबई हादरली! लोकल ट्रेनमध्ये बेल्टने मारहाण करून वृद्धाची हत्या