Ajit Pawar । सध्या अनेक तरुण तरुणी आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव देखील लावत असल्याचे आपल्याला दिसत आहे. सोशल मीडिया अकाउंट देखील तरुण-तरुणींचे हे आई वडील असे दोघांच्या नावाने असल्याचे दिसत आहे. यामध्येच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये एक मोठी घोषणा केली आहे. मुला मुलींच्या नावांमध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचे नाव असेल अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. (Latest Marathi News)
आधी स्वतःचं नाव त्यानंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव लावलं जायचं मात्र इथून पुढे आधी मुलाचे किंवा मुलीचे नाव नंतर आईचं नाव आणि त्यानंतर वडिलांचे नाव आणि मग आडनाव असे संपूर्ण नाव असणार आहे. अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. बारामती मधील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी ही घोषणा केली आहे.
Tanaji Sawant Car Accident । सर्वात मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात
त्याचबरोबर यावेळी त्यांनी बारामतीकरांबद्दल देखील आदर व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बारामतीकरांनी मला आज आशीर्वाद दिला आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सत्तेत असू तर आपण कामे करू शकतो. तुमच्या आशीर्वादाने आज मी राज्यात सत्तेत आहे. जर आज मी सत्तेत नसतो तर कामे करायला जमलं असतं का? मला तुम्ही सांगा… असा देखील प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
Train Accident । धक्कादायक! डब्यात चढताना महिला लेकरांसह रुळांवर पडली