Ajit Pawar । मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा तरुण सध्या आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून त्याचा थेट फटका आता राजकीय नेत्यांना बसत आहे. मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामध्ये वाद सुरू आहेत तर आता दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मराठा बांधवांचा विरोध पाहायला मिळाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar News )
ChatGPT ने एका वर्षात केले ‘हे’ मोठे बदल; जाणून व्हाल थक्क
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावांमध्ये प्रवेश बंदचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला आहे. दरम्यान तरीदेखील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी मराठा बांधवांनी त्यांच्या या दौऱ्यालाही विरोध दर्शवला होता. आता अजित पवार यांच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला देखील मराठा बांधवांनी विरोध केला आहे. (Latest Marathi News)
Accident News । ट्रक आणि जीपचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी
संमेलनाच्या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांनी येऊ नये अशी भूमिका आता मराठा बांधवांनी घेतली आहे. मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या कार्यक्रमाला मराठा बांधवांनी राजकीय नेत्यांनी येऊ नये अशी भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र देखील तहसीलदारांना दिले आहे.
Exit Poll 2023 । मोठी बातमी! भाजपला धक्का बसणार? छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेस विजयाच्या वाटेवर