Ajit Pawar । महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोरात प्रचार करताना दिसत आहेत. पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यात लढत पार पडणार आहे, त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी नुकताच एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. (Loksabha election 2024)
Viral News । लग्नापूर्वीच नवरदेवाचं धक्कादायक कांड, नवरीसह कुटुंबीय पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये
शिरुर लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. “आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी पाच वर्षांपूर्वी आपण खूप झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोना आला. या संकटात ते आपला राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते”, असा धक्कादायक गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
Eknath Shinde । ‘एकनाथ शिंदे मध्यरात्री अधिकाऱ्यांना भेटले आणि…’, काँग्रेसचा धक्कादायक आरोप
“तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका, असे मी त्यांना मी विचारले होते,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महायुतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख,बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार बोलत होते.
Lok Sabha Election । लोकसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश