Ajit Pawar । बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. (Loksabha election 2024) खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी प्रचारसभेत एक किस्सा सांगितला आहे, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आहे.
Sharad Pawar । राजकरणात मोठी खळबळ! भरसभेत शरद पवारांनी ऐकवली मोदींच्या भाषणाची ‘ती’ ऑडिओ क्लिप
“तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिले तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकारचा निधी असणार आहे. ही सर्व माझी पण जबाबदारी आहे. जरी उद्या बायकोने घरी म्हटले, हे काम करुन द्या, तरी मला ते करुन द्यावेच लागणार आहे. नाहीतर माझे काही खरे नाही,” असे मिश्कील वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
Baramati Loksabha । बारामतीत हाय व्होल्टेज लढत वेगळ्या वळणावर? दोन्ही पवार एकाच गाडीवर
“आता तुम्ही घड्याळ मतदान करा, म्हणजे आपोआप तुमचा खासदार हा प्रश्न सोडवणार आहे. मागील निवडणुकीत तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच या ठिकाणी काहीच चालत नाही,” असा टोला देखील त्यांनी सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांनी लगावला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
Lok Sabha Election 2024 । “अमरावतीत कधीही हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते”, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा