Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । “पुन्हा एकदा मोदींना…”अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Ajit Pawar

Ajit Pawar । आगामी लोकसभा निवडणूक (Upcoming Lok Sabha Elections) जवळ येत आहे. यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) उभी फूट पडली असून चिन्ह आणि पक्ष हे अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शरद पवार गटाने मोठा संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी रायगड (Raigad) दौरा केला आहे. यावेळी रायगडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे.

Sharad Pawar । भाजप देणार शरद पवारांना जबरदस्त धक्का? विश्वासू नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग

या भूमिपूजनानंतर अजित पवार यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले, “सध्या आपण युतीमध्ये आहोत. काम करताना विरोधात प्रश्न विचारून प्रश्न सुटत नाही. त्यामुळे सत्तेत असणं खूप गरजेचं असतं. लोकसभेत मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडून आणून पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून आणायचे आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

Eknath Shinde । “…तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन रडले” बड्या नेत्याचा दावा

त्याचबरोबर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “असं खेळीमेळीचं वातावरण राहु द्या. आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायचे आहे. सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ‘घड्याळ तेच वेळ नवी’, असं स्लोगन आपल्या पक्षाचं असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. सध्या आपण महायुतीत आहे आणि आपण एनडीएमधून निवडणूक लढवायची आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

Fire news : आई-वडील गेले ऊस तोडणीसाठी बारामतीला, मात्र घरी चिमुकल्यासोबत घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version