
Ajit Pawar । अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गटातील नेते त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. अजित पवार अनेक कार्यक्रमांमधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कधी नाव घेऊन तर कधी अप्रत्यक्षपणे टीका करतात. सध्या देखील अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Mumbai Fire News । मुंबईत ग्रँट रोडवरील कामाठीपुरा परिसरात भीषण आग; नागरिकांची मोठी धावपळ
अजित पवार यांनी पक्ष सोडून आणि पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपबरोबर चूल मांडली आहे असा आरोप शरद पवार गटाने केला. यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेल चालता मग भाजप बरोबर का चालत नाही? असा मोठा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
त्याचबरोबर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. मात्र वरिष्ठांनी जर निर्णय घेतला तर तो बरोबर आणि आम्ही घेतला तर तो चूक असं कसं चालेल. उद्धव ठाकरे यांचं सरकार जातंय हे समजलं होतं त्यावेळी पक्षातील सर्वांनी ठरवलं होतं की आपण भाजपमध्ये सामील व्हायचं. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील झालेल चालतं. मग महायुतीत भाजप बरोबर गेलेलं का चालत नाही? असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. जुन्नर या ठिकाणी त्यांची एक सभा पार पडली यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Chandrpur News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या