Ajit Pawar Post for Suraj Chavan । ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले बारामतीजवळील मोढवे गावात उत्साहात पार पडला. या पर्वाचा विजय सूरज चव्हाणने मिळवला, ज्याने ७० दिवसांच्या कठीण स्पर्धेत इतर स्पर्धकांना मागे टाकून शोची प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली. सूरजच्या या यशाने त्याच्या फॅन्समध्ये आनंदाची लहर तर निर्माण केलीच, पण अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीदेखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी सोशल मीडियावर सूरजचं अभिनंदन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सूरजच्या विजयाबद्दल आपल्या पोस्टमध्ये त्याच्या संघर्षाचा उल्लेख केला. हे सर्व पाहून सूरजच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे, आणि त्याचा हा विजय बारामतीसाठी विशेष गर्वाचा विषय बनला आहे.
Ajit Pawar । “आम्ही आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यास आम्ही प्रयत्नशील” – अजित पवार
अजित पवारांची पोस्ट
“आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!” अशी पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
Maharastra News । सर्वात मोठी बातमी! काँग्रेस खासदाराच्या मुलाला अटक