Baramati Loksabha । अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता, समोर आली महत्त्वाची माहिती

Baramati Loksabha

Baramati Loksabha । बारामती मतदारसंघात यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) अशी लढत पार पडणार आहे. कालच या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे. (Ajit Pawar Property)

Supriya Sule । राजकीय वर्तुळात खळबळ! सुप्रिया सुळेंबाबत धक्कादायक बातमी समोर

अजित पवार यांनी 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या नावे 27 कोटीपेक्षा जास्त किमतीची संपत्ती होती. तर लोकसभा उमेदवारीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

Pune News । लग्नाला अवघे काही तास बाकी, मात्र नवदेवासोबत घडलं भयानक; संपूर्ण कुटुंबावर पसरली शोककळा

तसेच काल दाखल केलेल्या अर्जानुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे 225 कोटी रूपयांची संपत्ती तर अजित पवार यांच्याकडे सुमारे 150 कोटी रूपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं तब्बल 55 लाखांचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी दाखल केलेल्या अर्जात संपत्तीबाबत शपथपत्र जोडलं आहे. यात सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर असलेलं कर्ज आणि उपन्नाची माहिती देण्यात आली आहे.

Salman Khan । सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी माहिती समोर; पोलीस चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर

Spread the love