आज पहाटे 6.30 ते 6.45 च्या सुमारास सप्तश्रृंगी (Saptsringi) देवीचं दर्शन करून परतत असताना शार्प टर्नवर घाटातील गणपती पॉइंटजवळ एका बसचा अपघात (Nashik Bus Accident) झाला आहे. या अपघातामध्ये एक भाविक जागीच ठार झाला तर १८ भाविक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी आणि पोलिसांनी धाव घेत मदत कार्य सुरु केले. त्यांच्यावर नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)
Delhi Crime । महिलेच्या शरिराचे तुकडे करून फेकले पुलाजवळ, धक्कादायक घटनेने दिल्ली पुन्हा हादरली
यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन त्यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली. जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीही जखमींवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ही राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा येथील खामगाव (Khamgaon) आगारातील बस आहे. बुधवारी सकाळी घाट मार्गावर चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे बस दरीत कोसळली. या बसमध्ये ३२ भाविक होते त्यातील १५ भाविकांना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामध्ये एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अजूनही स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी माध्यमांना दिली आहे.
हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुन्हा ढगफुटी! मुसळधार पावसामुळे 90 जणांचा मृत्यू