
चंद्रशेकर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं होत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीला विनंती करण्यात आली होती. मात्र तरीदेखील ही निवडणूक लागली. यामुळे २६ तारखेला कमळासमोरच बटन दाबा आणि अजित पवार यांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की त्यांनी परत कधी चिंचवडचे नाव नाही घेतले पाहिजे. असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. आता त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी केली आगळीवेगळी मागणी; म्हणाले…
या विधानांबाबत अजित पवारांला विचारलं असता अजित पवार म्हणाले, “अरे बापरे… एवढ्या व्होल्टचा करंट दिला तर मी मरून जाणार… माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना आता श्रद्धांजली अर्पण करावी लागेल का काय? अशा शब्दात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलताना विचार करून बोला, बोलण्याचं तारतम्य ठेवा. बोलण्याची संधी मिळाली म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करू नका. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.” असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या चुकीमुळेच शिवसेना व पक्षचिन्ह शिंदे गटाकडे; निवडणूक आयोग म्हणाले की, “त्यांनी….”