Site icon e लोकहित | Marathi News

संजय राऊत धमकी प्रकरणी अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा घटना…”

Ajit Pawar reacts on Sanjay Raut threat case; Said, "Such incidents..."

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सगळीकडे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे.

धक्कादायक! जळगावमध्ये वडिलांवर आणि मुलावर मधमाशांनी केला हल्ला अन् हल्ल्यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतं आहे. यावर विरोधकांनी प्रतिक्रिया देत सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामध्येच आता अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या राजकारणावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “आजच्या परिस्थितीत…”

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणी पोलिस विभाग, सरकारने योग्य ती नोंद घेत पुढील कार्य़वाही करावी, अशी अपेक्षा आहे. असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “खासदाराबाबत अशा घटना घडत असतील तर लोकसभा, राज्यसभा त्याची दखल घेते. मी यासंबंधी माहिती घेत आवश्यक ते सहकार्य करेन, अस देखील अजित पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

‘चंद्रा’ गाणं गाऊन महाराष्ट्राला वेड लावलेला शाळकरी मुलगा आठवतोय का? आता गातोय चित्रपटातही…

Spread the love
Exit mobile version