राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही घोषणा केली आहे. आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. पण अजित पवार यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नसून, महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहण्याचा संदेश देण्यात आला. यांनतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लग्नाला अवघे तीनच दिवस झाले, अन् बायकोने केला नवऱ्याचा खून; घटनेचे कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
अजित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय खासदार सुनील तटकरे, डॉ.योगानंद शास्त्रे, के. शर्मा, पी.पी. मोहम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस.आर. कोहली, नसीम सिद्दीकी यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे सर्व मित्रपक्ष पवार साहेबांच्या विश्वासावर काम करतील असा विश्वास आहे.
“देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही…“, पाकिस्तानच्या ‘या’ बड्या प्लेयरची राहुल द्रविडवर टीका
तसेच, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला हृदयात ठेवून आणि राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून देशाचं आणि राज्याचं भविष्य घडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अमूल्य योगदान देईल. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी या ध्येयासाठी काम करेल, असा आमचा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन! असे ट्विट करत अजित पवार यांनी केलं आहे.
‘Sharad Pawar | या’ कारणामुळे अजित पवार यांना पद दिलं नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं