पुण्यातील भाजप नेते रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यांनतर अनेक चर्चा सुरु झाल्या. अनेक तर्कवितर्क देखील लावले गेले.
अजित पवार घेणार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात पुन्हा रंगल्या चर्चा
भाजप नेते रवींद्र साळगावकर (BJP leader Ravindra Salgaonkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “जर कोणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहीजे. त्यामुळे पोलिसांनी आणि सरकारने भाजप नेते रवींद्र साळगावकर यांना संरक्षण द्यावं. अस या प्रकरणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले.
मोठी बातमी! अजित पवार भाजपात जाणार? ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण