Ajit Pawar । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यातर्फे पिंपरी आणि आकुर्डी याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पाचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी संगणकीय सोडत काढली. त्यावेळी त्यांनी बोलताना एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकारण पेटू शकते. (Maharashtra politics)
“बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा. कारण मी काही वर्षापूर्वी खासदार झालो त्यावेळी लोकसंख्या काय होती आणि आता म्हणजे ३३ वर्षांनी किती लोकसंख्या झाली. आता लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेव जरी आला तर सर्वांना घर बांधून देऊ शकत नाही,” असे मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. (Latest marathi news)
Eknath Shinde । मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांचे नवे आदेश
“तसेच या योजनेच्या लॉटरीसाठी महानगरपालिकेकडून (Municipal Corporations) कोणताही दलाल नेमण्यात आला नाही. नाहीतर मार्केटमध्ये तुम्हाला कोणी नंबर काढून देतो तर तक्रार करा, त्यांना सोडणार नाही. नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात माझ्यामुळेच तुमचं स्वप्न पूर्ण झालं, नंतर तुमच्याकडून हे लोक पैसे लुबाडतील,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
Sanjay Shirsat । संजय शिरसाट यांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा!