कसब्याचा निकाल ऐकून अजित पवार म्हणाले, “माझी स्थिती आता कभी खुशी कभी गम…”

Ajit Pawar said after hearing the result of the village, "My condition is now Kabhi Khushi Kabhi Gham..."

पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. या विजयाने कसब्यातील मागील 25 वर्षांचा बालेकिल्ला ढासळला असून हा ऐतिहासिक विजय असल्याचे सांगितले जात आहे

ज्याच काम दमदार तोच आमदार! ब्राम्हण केंद्रित पेठांमध्येच भाजपला मोठा धक्का

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीमध्ये अगदी आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की, सध्या माझी स्थिती ‘कभी खुशी कभी गम’ अशी आहे.

पराभव होताच हेमंत रासने यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या पराभवाला जबाबदार…”

कसब्यात गेली 25 वर्षे भाजपची ( BJP) सत्ता होती. याठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेऊन आम्ही रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. खरंतर त्याच वेळी आम्ही आमची अर्धी निवडणूक जिंकलो होतो. असे अजित पवार म्हणाले आहेत.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसब्यातून रवींद्र धंगेकरांचा विजय

या पोटनिवडणूकीसाठी सत्ताधारी पक्षाने सर्वच गोष्टींचा वापर केला. मात्र महाविकास आघाडीने मित्र पक्षांसोबत एकजूट करून व गरज असणाऱ्या सर्व गोष्टींचा वापर करून हा विजय खेचून आणला आहे. अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन देखील केले आहे.

कसब्याच्या फक्त दोन फेऱ्या बाकी; धंगेकर आघाडीवर, कार्यकर्त्यांनी केली गुलालाची उधळण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *