राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या रामदेव बाबांवर केलेल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. आधीच ते त्यांच्या मिश्किल व रोखठोक बोलण्याने प्रसिद्ध आहेत. याच मिश्किल शैलीत त्यांनी रामदेव बाबांवर (Ramdev Baba) विधान केले आहे. हे विधान ऐकून सभागृहात देखील मोठा हशा पिकला.
भाजप नेते आक्रमक! जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास मिळणार १० लाखांचं बक्षीस
अहमदनगर येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी बुवाबाजीवर भाष्य करत रामदेव बाबांना टार्गेट गेले. दरम्यान ते म्हणाले की, ” तुम्ही नखांवर नख का घासता? रामदेव बाबांनी सांगितल म्हणून, मी सुद्धा रामदेव बाबांनी सांगितले तसे नखांनी नख घासले. पण माझे सगळे केस गेले आणि आता नवीन केसं येण्याच नावच नाही. या बुवा लोकांचं काही ऐकू नका” हे ऐकताच सभागृहात लोक हसून हसून लोटपोट झाले.
मोठी बातमी! राखीकडून आदिलच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; फोटो देखील झाले व्हायरल
बुवालोकांचं ऐकण्यापेक्षा साधूसंत व महापुरुषांचं ऐका. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांचे विचार ऐका. मौलाना आझाद, शाहू-फुले-आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महान लोकांचे विचार ऐका. मात्र चुकूनसुद्धा बुवाबाबांचे ऐकू नका. असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
एकाच घरातील दोघांनी भरला उमेदवारी अर्ज; चिंचवड पोटनिवडणुकीत नवीन गोंधळ
नखाला नख घासून तिसरच काहीतरी व्हायचं. यानंतर डॉक्टरांकडे जावे लागेल. मग डॉक्टर म्हणतील हे कोणी केले. तिथे पुन्हा तुम्हाला खर्च करावा लागेल. त्यापेक्षा तुम्ही सावध रहा. महापुरुषांना ऐका. असा सल्ला अजित पवार ( Ajit Pawar) यांनी उपस्थित लोकांना दिला आहे.
लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले…