Ajit Pawar । “अजितराव टोपी उड जाएगी”, बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

Ajit Pawar

Ajit Pawar । संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या देखील संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

Lok Sabha Elections । मोठी बातमी! सुप्रिया सुळे अहमदनगरमधून निवडणूक लढवणार? सुजय विखे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार यांचा राजकारणातील भीष्मापितामह असा उल्लेख केला. त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा निलंबित खासदार असा उल्लेख केला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिमिक्री करत निशाणा साधला आहे. “आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका, हवा तेज है, अजितराव टोपी उड जायेगी” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

Aryan Arora । प्रसिद्ध अभिनेत्यावर केअर टेकरचा प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, १० टाके पडले

त्याचबरोबर, त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, “लोकं म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकलं ते विकलं पण त्यांनी काही गोष्टी खरेदी देखील केल्या आहेत. त्यांनी कोर्ट खरेदी केलं, निवडणूक आयोग देखील त्यांनी खरेदी केलं. महाराष्ट्रातील आमदार खासदार खरेदी केले आहे. त्यामुळे काही विकलं तर काही खरेदी केल आहे, जे खरेदी केले त्याच्यावर ते राज्य करताय मात्र हे राज्य आपल्याला उलथून टाकायच आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sambhaji Nagar Fire । हृदयदावक! छत्रपती संभाजीनगर येथे हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, झोपेत कामगार जिवंत जळाले

Spread the love