
Ajit Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बजरंग सोनवणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Rohit Pawar । अमोल मिटकरी यांनी काढली रोहित पवारांची लायकी, म्हणाले; “तुझी खरी लायकी केवळ…”
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे. असे एका ओळीचे पत्र लिहीत बजरंग सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी या राजीनामयाची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि बजरंग सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंतसाठी धक्कादायक बातमी समोर
दरम्यान, अजित पवार गटाची साथ सोडल्यानंतर आज दुपारी चारच्या सुमारास बजरंग सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीड मधील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. मागच्या काही दिवसापासून बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्या संपर्कात होते आणि आज अखेर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Lok Sabha Election । भाजपचे टेन्शन वाढले! ‘हा’ नेता लढणार अपक्ष