शिंदे (Shinde) गट गुवाहाटी गेला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्ष अजित पवार नेते म्हणाले होते की, आता शिंदे गट कामाख्या देवीच्या पूजेला जाणार आहे. काही ठीकाणी आपण बकरा कापतो, कोंबडं कापतो. पण गुवाहाटीला रेडा कापतात असं म्हणतात. रेड्याचा बळी देतात. त्यामुळे शिंदे गट कोणाचा बळी द्यायला चालले माहित नाही”. आता यावर अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) प्रतिक्रिया दिली आहे.
“शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच”, संभाजीराजे भोसले कडाडले
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
“अजित पवारांनी बारामतीचा एखादा रेडा घेऊन गुवाहाटीला जायला पाहिजे, असं उत्तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “रेड्याचा बळी ही धार्मिक भावना आहे. त्यासाठी अजितदादांनी एखादा बारामतीचा रेडा घेऊन एकदा स्वत: गुवाहाटीला जायला पाहिजे”. असं देखील ते म्हणाले आहेत.
गाई-म्हशीच्या दुधापेक्षा फायदेशीर ठरतंय शेळीचं दूध; ‘हे’ आहेत फायदे
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “माझ्या पत्रकार मित्राने मला एक बातमी दिली. मागच्या वेळी शिंदे गट गुवाहाटीला गेला हॉटेलमध्ये राहिले पण बिल दिले नाही. त्यामुळे हॉटेलच्या मालकाने आत्महत्या केली. आता ही बातमी खरी का खोटी माहित नाही.आता शिंदे गट कामाख्या देवीच्या पूजेला जाणार आहे. काही ठीकाणी आपण बकरा कापतो, कोंबडं कापतो. पण गुवाहाटीला रेडा कापतात असं म्हणतात. रेड्याचा बळी देतात. त्यामुळे शिंदे गट कोणाचा बळी द्यायला चालले माहित नाही”