मविआच्या वज्रमुठ सभेतून अजित पवार कडाडले; म्हणाले, “धमक असेल तर…”

Ajit Pawar snarled from Mavia's Vajramuth meeting; Said, "If there is a threat..."

आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सभा होत आहे. या सभेला महाविकास आघाडीतीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर वेगेवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे.

सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य

मागच्या दोन तीन दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला होता. यावर बोलताना अजित पवारांनी सरकारला लक्ष केलं आहे. अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीची सभा होऊ नये, यासाठीच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडे केले जातायंत. या ठिकाणच वातावरण खराब केलं जात असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

‘या’ कारणामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला नाना पटोले राहणार गैरहजर!

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कांद्याला, कापसाला कवडीमोल दर मिळत आहे. कष्ट करून शेतकऱ्याला हातात फक्त १ किंवा दोन रुपया मिळत आहे. उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, कापूस प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकार भूमिकाच घेत नसल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर पंजा, मशाल आणि घड्याळ एकाच हातात घेऊन विजयासाठी जीवाचं रान करू असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

छोटू दादा झाला आचारी अन् पाच रुपयांना विकली बिर्याणी थाळी! पाहा व्हायरल Video

त्याचबरोबर सरकारला चॅलेंज देत अजित पवार म्हणाले धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, निव्वळ राजकारण करण्यासाठी त्यांचं नाव वापरू नका असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये प्रवेश करणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *