Ajit pawar । जुलै 2023 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले तमाम राष्ट्रवादी दिसले. पुढे बारामती लोकसभा निवडणूक सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात झाली. दरम्यान, भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसण्याची शक्यता आहे का? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.
Sharad Pawar । शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का; युवा नेता सोडणार साथ
अजित पवार काय म्हणाले?
“आजच्या घडीला आम्ही जी भूमिका घेतली आहे, ती इतरांना योग्य वाटली तर त्याठिकाणी पुढे काही होऊ शकतं. आज आम्ही ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतलीये, ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य वाटली. तर त्याच्यामध्ये भविष्यात काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत सध्या त्यांचे वक्तव्य सगळीकडे चर्चेत आहे.
Cyclone Remal । ब्रेकिंग! काही तासांत धडकणार रेमाल तुफानी चक्रीवादळ; ‘या’ ठिकाणी दिली धोक्याची घंटा