राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरून बरेच तर्कवितर्क लावणे सुरू आहेत. दरम्यान जेव्हापासून अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात तेव्हापासून सर्वांचेच अजित पवारांच्या हालचालींवर एकदम बारीक लक्ष आहे. यामध्येच आता अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
मोठी बातमी! गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात दोन तास चर्चा; राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण
एका मुलाखतीत अजित पवार म्हणाले, “२०२४ मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज कशाला, मी आता देखील दावा सांगू शकतो. २०२४ ची कशाला वाट पाहू, असं म्हणत अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं आहे.
त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही दिवसांत राजकीय भूकंप येणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहे. यावरून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
‘या’ कारणामुळे गौतमी आणि उर्फीवर कारवाई करता येत नाही; रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य