मुंबई : एखाद्या क्षेत्रातील व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी सरकारकडून विविध पुरस्कार दिले जातात. राज्य सरकारने साहित्य क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच जाहीर झाले होते. मात्र, शिंदे- फडणवीस सरकारने यावर्षीचा अनुवादित साहित्यासाठीचा ( Translated Litrature) पुरस्कार रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी देखील शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
हिवाळ्यात गुळ खाण्याचे फायदे; या आजारांतून होते सहज सुटका!
मागच्या आठवड्यात ६ डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने २०२१ वर्षातील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी पुरस्कार जाहीर केले होते. त्यात अनुवादित साहित्यासाठी अनघा लेले ( Angha Lele) यांना कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी देखील पुरस्कार जाहीर झाला होता. या पार्श्वभूमीवर मागील ६ दिवसांत पडद्यामागे काही घडामोडी झालेल्या दिसते. त्यामुळेच १२ तारखेला सरकारने अचानक शासकीय आदेश काढला व पुरस्कार निवड समिती बरखास्त केली. तसेच जाहीर झालेला पुरस्कारही रद्द केला. सरकारने त्यात हस्तक्षेप करणे गैर आणि निषेधार्ह आहे. असे म्हणत अजित पवारांनी साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेपावर निषेध व्यक्त केला आहे.
कापूस उत्पादक होणार आता मालामाल! महाराष्ट्रात राबविला जाणार ‘हा’ उपक्रम
जून महिन्यात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मोठे बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यात वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. कुठलेही सरकार सत्तेत आल्यानंतर लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्या दिवसापासून शिंदे- फडणवीस सरकार आले, तेव्हापासून आजपर्यंत रोज काही ना काही नवीन वाद काढायचे आणि समस्या निर्माण करायच्या त्यातून महत्त्वाच्या प्रश्नांबाबतचे लक्ष दुसरीकडे वळवायचे. असे शिंदे- फडणवीस सरकार करत आहे. असे मत व्यक्त करत अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.