मागील काही दिवस अवघा महाराष्ट्र शिंदे व ठाकरे गटातील सत्तासंघर्षाच्या निकालाची वाट पाहत होता. काल अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर सत्तासंघर्षाच्या काळात राज्यपालांची भूमिका व उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा यावरून सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
Jio Plan | डेली ३ GB डेटा आणि डेटा ऍड ऑन चे मोफत व्हाऊचर! जिओचा हा जबरदस्त प्लॅन एकदा ट्राय कराच…
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार उभे असल्याचा दावा कोर्टाने केला आहे. दरम्यान नैतिकतेच्या आधारावर शिंदे – फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी आज आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात राजीनामा देणार नाहीत पण स्वप्नातही ते राजीनामा देतील असा विचार तुम्ही करू नका. असा शाब्दिक फटकारा अजित पवार यांनी मारला आहे. (Eknath shinde & Devendra Fadanvis resignation)
“माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाने मला…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
नाना पटोले यांनी त्यावेळी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीने त्वरित निर्णय घ्यायला हवा होता. मात्र तो विषय लवकर निकालात निघाला नाही. तेव्हा विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त ठेवणे ही आमची सर्वात मोठी चूक होती. असे अजित पवार म्हणाले आहेत.