Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! निवडणुकांच्या तारखांच्या आधीच अजित पवारांकडून पहिला उमेदवार जाहीर

Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) तारीख जाहीर झालेली नसतानाही, सर्व पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात थेट लढत होईल, असे स्पष्ट होत आहे. महायुतीने जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात केली असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांना पुन्हा निवडून द्या, अशी अप्रत्यक्ष घोषणा केली आहे.

whatsapp new update । व्हॉट्सअ‍ॅपचे जुने अ‍ॅप बंद होणार; Apple Mac युजर्ससाठी नवीन अ‍ॅप डाउनलोड करण्याचा इशारा

चाकण नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला, ज्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे विधानसभेतील कार्याचे कौतुक केले आणि त्यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. पवार म्हणाले की, “महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत अद्याप काही ठरलेले नाही, पण राष्ट्रवादीला जर खेड आळंदीच्या जागेवर उमेदवारी मिळाली तर कार्यसम्राट दिलीप मोहिते पाटील यांना संधी द्या.”

Maharastra Politics । वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबत; मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि उदय सामंत यांची बैठक

पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या “सरपंचापासून आमदारापर्यंत” च्या प्रवासाचे कौतुक करत, त्यांना मंत्रीपदाची संधी देण्याचे आश्वासन दिले. “आता त्यांना पुढच्या टप्प्यात एक संधी देण्याची वेळ आली आहे,” असे पवार यांनी स्पष्ट केले. यासोबतच, पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या आक्रमक कार्यशैलीचे कौतुक करत, त्यांच्या पत्नीने त्यांचे नियंत्रण कसे ठेवले आहे याचेही सांगितले.

Politics News । राजकारणातून मोठी बातमी समोर! भाजपचा बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला

Spread the love