Ajit Pawar । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडलेल्या घटनांबद्दल मोठा खुलासा केला आहे. 2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापनेसंदर्भात अजित पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. यामुळे राज्यात आणि देशभरात राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
Rohit Pawar । “…त्यांनी आमचं घर फोडले” , रोहित पवारांचे धक्कादायक वक्तव्य
अजित पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 2019 मध्ये दिल्लीतील एका व्यापाऱ्याच्या घरी एक महत्त्वाची बैठक झाली होती, ज्यात अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार उपस्थित होते. “पाच बैठका झाल्या, आणि त्या बैठकीत सर्व निर्णय झाले होते,” असं अजित पवार म्हणाले. यावर शरद पवार यांनी भाजपसोबत जाऊन सरकार का स्थापलं नाही, असा प्रश्न विचारला गेल्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं की, “शरद पवार हे असे नेते आहेत की त्यांच्या मनात काय चाललंय ते कुणालाही सांगता येत नाही, अगदी त्यांच्या पत्नीलाही नाही.”
Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी; राजकीय वर्तुळात खळबळ
2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी कधीच फेटाळलं आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी 2017 ते 2019 दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या या खुलाशानंतर आता राजकारणात या बैठकीच्या संदर्भात चर्चा तीव्र झाली आहे आणि यामुळे आगामी निवडणुकीत अनेक नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
Nawab Malik । आताच्या घडीची मोठी बातमी! मतदानापूर्वीच नवाब मलिक तुरुंगात जाणार? समोर आली मोठी अपडेट.