Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । अजित पवार गटाच्या नेत्याने केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar

Ajit Pawar । मागच्या काही दिवसापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता स्वगृही परतणार आहेत. मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चानंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चेंबाबत मोठा खुलासा केला आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bjp । ब्रेकिंग! भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

प्रफुल्ल पटेल यांनी एकनाथ खडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, “एकनाथ खडसे यांचं मन राष्ट्रवादीत रमत नव्हतं, असा मोठा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “आम्हाला माहीत होतं की एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांचं मन रमत नव्हतं. असं ते म्हणाले आहेत.

Pranav Karad । धक्कादायक बातमी! पुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; 3 दिवसांपासून शोधाशोध सुरु

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची जागा दिली. पण त्यांचं मन त्यात रमलं नाही. बरं झालं ते पुन्हा भाजपात जात आहेत. आता आम्ही एकत्र काम करू, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

Eknath Khadse । सर्वात मोठी बातमी! एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; स्वतःच केला खुलासा

Spread the love
Exit mobile version