Ajit Pawar । माजी मंत्री शालिनी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवल आहे तर जलसिंचन घोटाळ्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजप सोबत घेऊन संरक्षण दिले असल्याचा गंभीर आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शलिनी पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये पूर्वीच्या जनसंघाने शिखर बँकेत 25000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Rohit Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता दाखल करणार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा
शलिनी पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. हा घोटाळा करूनही गुन्हा दाखल होऊन कारवाई होत नाही. तो घोटाळा देवेंद्र फडणीस यांनी झाकून टाकला तर शिखर बँकेतील 25000 कोटींचा घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना भाजप सोबत घेऊन झाकून टाकल्याचा आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे.