Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. काल श्रीनिवास पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शरद पवार साहेबांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे आपण त्यांना एकटं सोडणार नसल्याचं श्रीनिवास पाटील म्हणाले आहेत. अजित पवार यांनी वयस्कर माणसांची किंमत केली, ही गोष्ट वेदना देणारी असल्याचं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर आता अजित पवार गटातील नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Politics News | ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप? राज ठाकरे दिल्लीला रवाना
अमोल मिटकरी म्हणाले, “स्वतःच्या सख्या भावाला विरोधात उभे करण्याचा हा कुटील डाव आहे. बारमतीकरांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बारमतीकर हुशार आहेत. कोणी त्यांना खंबीरपणे साथ दिली हे बारामतीकर जाणून आहेत, त्यामुळे या छोटेखानी सभेचा काहीच परिणाम होणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मांडली. काल गाव सभामध्ये श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर केलेल्या टीकेवर मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Ajit pawar । “अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, पण…” बड्या नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ
भावनिक वातारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादांचा परिवार हा सबंध बारामतीकर आहे. आज श्रीनिवास पवार बोलत आहेत ते यापूर्वी काही का बोलले नाही असा सवाल उपस्थित करत भावनिक वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही असे सांगत सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करू व त्यांना निवडून आणू असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.”
Viral Video । ऋषिकेशमध्ये प्री-वेडिंग शूट करणं जोडप्याला पडलं महागात… घडलं भयानक, पाहा Video