
Ajit Pawar Vs Amol Kolhe । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना ओपन चॅलेंज दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी भल्या पहाटे शिरूर मतदार संघाची पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी शिरूर मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा देखील घेतला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “आम्ही आमचा निर्णय घेणार, शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल असं. ठाम मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केल आहे. (Politics News)
त्याचबरोबर मी जे काही चॅलेंज काल अमोल कोल्हे यांना दिले होते. त्याचा आणि आज झालेल्या दौऱ्याचा काही संबंध नसल्याचे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. माझा हा दौरा नियोजित होता असं ते म्हणाले आहेत. मात्र तरी देखील अजित पवार यांच्या या दौऱ्यावरून अनेक तर्कवितर्क राज्याच्या राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिल्यानंतर अमोल कोल्हे आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ही भेट पुण्यात होणार असून शरद पवार याबाबत अमोल कोल्हे यांना नेमका काय सल्ला देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
CGS Vikram । भारतात येणाऱ्या जहाजावर ड्रोन हल्ला कोणी केला? समोर आली धक्कादायक माहिती