मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी पवारांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात मदतीवरील भाष्य केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
अतीवृष्टी, पूर, दुष्काळ किंवा चक्रीवादळ सात महिने सरकारच्या काळात कोणतीही मदत केली नाही. असा टोला फडणवीस यांनी अप्रत्यक्ष पवारांवर लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानासंदर्भात आज अजित पवार यांना पत्रकारांनी विधानबाबत विचारला असताना आम्हाला प्रश्न विचारून जनतेचे प्रश्न सुटणार नाही असा टोला पवारांनी फडणवीसांना लगावला.
मराठवाडा विदर्भ इतर भागातील शेतकरी अतिवृष्टीमुळे व्याकुळ झाले आहेत. “शेतकरी आत्महत्या करतोय राज्यात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.आम्ही काहीतरी सांगितलं की मग तुम्ही नव्हते का सात महिने आणि पाच महिने करत वगैरे बोलणं चुकीचं आहे. हे काही समस्येवरील उत्तर नाही. त्यांचे पंचनामे कसे ताबडतोब सुरु होतील. शेतकऱ्यांना मदत कशी लवकर मिळेल फडणवीस यांनी असे उत्तर दिले पाहिजे. शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करायची असेल तर बियाणे परत कसे मिळेल त्याचे उत्तर पाहिजे” असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
पूरग्रस्तांना व अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान यांना एका आठवड्यात मदत मिळेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी नुकताच आढावा घेतला तेव्हा 50 टक्के पंचनामे झाले होते. उर्वरित पंचनामे झाल्यावर मदतीचा निर्णय होईल