Baramati News । महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोरात प्रचार करताना दिसत आहेत. पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यात लढत पार पडणार आहे, त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत गावागावात धमकीसत्र असल्याचा गंभीर आरोप अजित पवारांवर (Ajit Pawar) बड्या नेत्याने केला आहे.
Ajit Pawar । ब्रेकिंग न्यूज! भरसभेत अजितदादांनी धरले कान; नेमकं काय घडलं?
महायुतीचा उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बारामतीतमधील गावागावात धमक्या देत आहेत. व्यापारी आणि उद्योजकांना नोटीस पाठविल्या जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची भाषा सुरु आहेत,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. (Ajit Pawar vs Sanjay Raut)
Lok Sabha Elections २o२४ । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला बसला सर्वात मोठा धक्का!
“बारामती मतदारसंघासाठी दिल्ली-गुजरातमधील कोणी शरद पवार यांच्या पराभवाची भाषा करत असेल तर आम्ही मराठी माणूस म्हणून सर्व एकत्र आहोत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव आम्ही करून दाखवल्याने देशाला दाखवत असाल तर ते अशक्य आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत आम्ही सर्व भावंडं आहोत,” असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.