Ajit Pawar । मोठी बातमी! या बड्या नेत्याने उडवली अजित पवारांची झोप

Ajit Pawar

Ajit Pawar । लोकसभा निवडणुकीचं (,Loksabha election) बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. जनता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला निवडून देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. (Latest marathi news)

Praniti Shinde । काँग्रेसचं ठरलं! सोलापूर मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर; भाजपकडून कोण असणार उमेदवार?

या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि शिंदे गटाचे विजय शिवतारे (Vijay Shivatare) निवडणूक लढवणार आहेत. या तिन्ही नेत्यांमध्ये आगामी निवडणूक खूप अटीतटीची होईल. एका मुलाखतीत विजय शिवतारेंनी जुन्या विधानाची आठवण अजित पवारांना करून दिली आहे. त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढली आहे. (Vijay Shivatare vs Ajit Pawar)

Ahmednagar Politics । मोठी बातमी! अहमदनगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट

“माझी अजित पवार यांच्यावर कसलीच नाराजी नाही. त्यांच्यावर माझ्या मतदारसंघामधील लोकांची नाराजी आहे. २०१९ च्या सांगता सभेमध्ये अजित पवार म्हणाले होते की, मरतोय तर कशाला लढतोय? मेला तर पुन्हा बाय इलेक्शन होईल. मी हे विसरलो आहे, नियती त्यांना पाहून घेईन. मतदारसंघातील स्वाभिमानी मतदार हे विसरणार नाही.जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे,” असे शिवतारेंनी स्पष्ट केले आहे.

Sharad Pawar । शरद पवार संतापले, त्या घटनेचा केला तीव्र निषेध

Spread the love