एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आणि भाजपशी युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यांनतर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सतत टीका करत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारला धारेवर धरत असतात. आता अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
धुलिवंदनानिमित्त जावयाची गाढवावर बसून काढली जंगी मिरवणूक
अजित पवार म्हणाले, मागच्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाला देऊ असं सांगतायेत मात्र मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर जे आमदार सध्या आहेत ते देखील निघून जातील असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.
‘या’ गावात होळीनिमित्त मुलाचे मुलाशीच लावले जाते लग्न; जाणून घ्या या विचित्र प्रथेबद्दल सविस्तर…
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देखील अजित पवारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. अजित पवार म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी आपण शेतकऱ्याच्या पाठिशी उभं रहायला पाहिजे याबद्दल तर हो बोलायला तयार नाहीत. अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”