Site icon e लोकहित | Marathi News

अजित पवारांनी भाजपच्या बड्या मंत्र्याला दिला इशारा; म्हणाले, “पुण्यात असले खपवून घेतले…”

Ajit Pawar warns senior BJP minister; He said, "It was tolerated in Pune..."

पुण्यात कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या एका बड्या मंत्र्याला फटकारले असून पुण्यात असले खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला आहे.

परदेशात राहणारी तीन वर्षीय मुलगी गाते शिवाजी महाराजांचे पोवाडे; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

काल केसरी वाड्यामध्ये भाजपच्या ( BJP) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश बापट ( Girish Bapat) यांनी आजारी असून देखील ऑक्सिजन ट्यूबलावून, व्हीलचेअरवर बसून मेळाव्यासाठी उपस्थिती लावली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आजारी असून देखील गिरीश बापट यांनी मेळावा केला.

मोठी बातमी! पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरणी तरुणीला अटक

दरम्यान गिरीश महाजन एका आरोपीसोबत दिसले होते. हे अत्यंत चुकीचे असून याबाबत पोलीस व निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. गुंड प्रवृत्तीला सोबत घेऊन दहशत निर्माण केली जात असेल तर आयुक्तांनी याबाबत नोंद घेतली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीचे वागणे पुण्यात खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाला नवे वळण! आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार

Spread the love
Exit mobile version