Ajit Pawar । संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Lok Sabha Constituency) लागले आहे. कारण पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) फुटीनंतर मतदार शरद पवार गटाला की अजित पवार गटाला निवडून देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच उपमुख्यंमत्री अजित पवारांनी कुटुंबातील व्यक्तींना इशारा दिला आहे. (Latest marathi news)
अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. याचा आता अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Srinivas Pawar vs Ajit Pawar) “माझ्या निवडणुकीमध्ये माझी भावंडं कधीही फिरली नाहीत. आता गरागरा फिरत आहेत. जशा पावसाळ्याच्या दिवसात छत्र्या उगतात तशी उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलत आहे. एकदा का जर मी तोंड उघडलं तर कित्येकांना तोंड दाखवता येणार नाही. तोंड लपवून फिरावं लागेल,” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
“काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी बारामती मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यावेळी त्यांना इतरही अनेक फोन येत होते”, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
Ashish Jaiswal Accident । सर्वात मोठी बातमी! शिवसेना आमदाराच्या कारचा भीषण अपघात