राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही घोषणा केली आहे. आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. या सर्वांमध्ये अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. आता यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लग्नाला अवघे तीनच दिवस झाले, अन् बायकोने केला नवऱ्याचा खून; घटनेचे कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
अजित पवारांना पद का दिल नाही यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहे. त्यामुळे आधीपासूनच त्यांच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणून त्यांना पक्षात कोणतेही पद देण्यात आलेले नाही. पक्षाच्या या निर्णयावर अजित पवार नाराज नसल्याचं देखील शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यामध्ये भंगार दुकानाला लागली भीषण आग! संपूर्ण परिसरात धुराचे सावट
दरम्यान, आता इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.